Tuesday, December 6, 2005

शनिवारी पाचच्या सुमारास फ़ोन करून GS ने ओव्हरनाईट ट्रेक करुयात का म्हणून विचारले म्हणण्यापेक्षा सांगितलेच.तोरण्याचा plan ठरत होता. पण नंतर लोहगड आणि विसापूर जायचं ठरलं. मी, GS आणि cool असे तीन जण तयार होतोच.पुढच्या दहा मिनिटांत फ़ोनाफ़ोनी करून प्रसाद मोकाशी,फ़दी,अमित सवाई,मिहीर आणि अर्जुन असे मिळून आठ जण तयार झाले.या वेळेस हा पुरुषांचा exclusive treck असल्याने अनेक निषेध संदेश आले.अम्ही निघणार असलेल्या लोकलवर दगडफ़ेक होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. पण आठला निघण्याऐवजी दहाच्या गाडीने निघायचे असं ठरल्याने आम्ही एका मोठ्या संकटातून बचावलो.मात्र वेळ बदलतांना बदली वेळ अगदी गुप्त ठेवण्यात आली होती. तीन जण पुणे स्टेशन ,चार जण शि.न. स्टेशनहून निघालो.कुल पुढे मळवलीत भेटला.तिथूनच आमच्या ट्रेकची सुरवात झाली. रात्री बाराच्या सुमारास मळवलीहून आम्ही लोहगडाकडे चालत निघालो. हे अंतर सहा किमी आहे.रस्ता तितका चढणीचा नाही. पण तिनेक महिन्यांच्या विश्रांतिनंतर ट्रेकला निघालो असल्याने थोडे दमायला होत होते.उजव्या बाजूला द्रुतगतिमार्ग,पुढे दिसणारं लोणावळा शहर आणि वर निरभ्र आकाशातल्या तारकांची सोबत पाहता मार्गक्रमण विनसायास चालू होते.अर्जुन हा आकाशनिरीक्षक आहे. त्याने दाखवलेले तारे आणि तारकासमूह ,प्रसाद,मी आणि मिहीरची गाणी असा एकूणच निवांतपणे आम्ही निघालो होतो.दोन तिनदा विश्रांति घेऊन आम्ही रात्री दोनच्या सुमारास गडावर पोचलो.अंधारातही गड किती उत्तम स्थितित आहे हे जाणवत होतं.आतापर्यंतच्या पाहण्यातला हा खूपच देखणा गड वाटत होता.गडावर वस्तीला राहता येईल अशी मोठ्ठी गुहा आहे. आम्ही पोचलो तेव्हा तेथे पाचसात जण शेकोटी करून शेकत बसलेले होते. गडावरच्या दर्ग्याला येणारे बरेचजण तिथे होते.गुहेत विसेक जण तरी झोपलेले होते.आम्ही आसपास भटकून येऊन मग झोपायचे ठरवले. थोडं पुढे गेल्यावर मोकळं पठार दिसताच तिथे तिथे बस्तान मांडले.हळूच चिवडा,लाडू असे पदार्थ बाहेर पडले.त्यावर ताव मारत आकाशनिरीक्षण चालू झाले.गच्च भरलेल्या आकाशातून अर्जुन बरोबर तारे शोधून काढत होता आणि आम्हाला माहीती पुरवत होता. लोहगडवाडीपासून आमच्याबरोबर एक कुत्री सोबत करत इथेही आली.गडावर असणार्या माकडांपासून तिच्यामुळे आम्हाला संरक्षण लाभले होते. अथांग विश्वाच्या पसार्यात मोठमोठे तारे ठिपक्यापमाणे वाटत होते. या पसार्यात स्वतःबद्दलचा विचार करत गुहेत झोपयला परत आलो तेव्हा तीन वाजून गेले होते. सकाळी साडेसहालाच जाग आली.उजेड दिसत होता पण पूर्ण उजाडलेलं नव्हतं.ताबडतोब विंचूकाटामचीला जायला निघालो.माचीवर उतरतांना पंधरा फ़ुटांचा rock-patch पार करावा लागला. माचीवरून पवना धरणाचा रम्य परीसर डोळ्यांत मावत नव्हता. एका बाजूला तिकोना,धरणाच्या पलिकडचा तुंग,अगदी दूरवर दिसणारं ड्यूकाचं नाक (Duke’s Nose) मागे दिसणारा विसापूर पहात बराच वेळ निघून गेला. यावेळेस आणलेली दुर्बिण एकेकाच्या हातात फ़िरत होती. थोड्या वेळाने आम्ही गड उतरायला लागलो. पुढचा टप्पा म्हणजे विसापूर! तिकडे जावं की न जावं यावर बरेच वाद होऊन शेवटी एक्मताने म्हणजेच केवळ GS च्या मताने विसाओपूरला जायचे ठरले.द्रुतगतिमर्गाच्या बरोब्बर विरुद्ध बजूने चढाई सुरू झाली.गडाचा विसतार पाहता अकरा वाजता प[अरत मळवलित पोचू याची शश्वति नव्हतीच.पण किमान बाराला तरी पोचूत असे वाटले.मध्ये एका ठिकाणी फ़दी वेगळ्याच वाटेने गायब झाला.झाडी,घळी आणि पाण्याचा मार्ग अश्या वाटेने एका ठिकाणी सर्वजण जमले. समोर सरळसोट चढ आणि गडाची तटबंदी दिसत होती.कुल,GS,अर्जुन त्या तटबंदीला आधीच भिडले होते.फ़दी कुठूनतरी आणि कसातरी गडावर पोचला होता. मी आणि मिहीर मिळून अमितला मदत करत होतो. त्याचा चपलेमुळे गुढगा त्रास देत होता. प्रत्येककवेळी चप्पलकर नेहेमीच अडचणीत सापडतात.अर्ध्या चढावरून GS ने कुलला तो रस्ता टाळण्याचा सला दिला. पण दोघांनाही परतणे अशक्य होते.तोपर्यंत मी cramp आलेल्या कुलपर्यंत पोचलो.वर चढून माझं सामान ठेवून परत कुलसाठी खाली आलो.तोपर्यंत अमितला एक सोपा रस्ता धरायला सांगितलं होतं.मिहिरलाही आही आलेल्या रस्त्याने न येण्याचा सल्ला दिला गेला. पण ते त्याला जरा जास्तच लागलं. आणि पठठा त्याच चढावरून वर आला.पंधरा वीस फ़ुटांचा शेवटचा नव्वद अंशातला चढ चढणे खरंच धोकादायक आणि आवघड होते. कारण आधारासाठी हात लावताच मोठमोठे दगडही सुटून खाली येत होते. पण हार मानणार्यातले आम्ही नव्हे! वर जाऊन पाहतो तर प्रसादने आधीच एका सावलीची जागा पहून पथारी टाकलि होती.पाण्याची शेवटची बाटली संपवली.GS पुढे रस्ता शोधून आला.तिकडे निघालो तर पाण्याचं एक कुंड दिसलं. त्यात पाय बुडवताच विविध आवाज आपोआपच तोंडातून निघावेत ईतकं पाणी थंड होतं.दगडावर बसून पाण्यात पाय सोडून बसण्याची चक्कर घेऊन अगदी न राहवल्याने दोन्तीन जण पाण्यात उअतरलेच आणि अर्धापाऊण तास त्यातच गेला.थोडं पुढे जाऊन पाहिलं तर अम्ही चढीन आलेला चढ दिसला. आणि आम्ही काय प्रकार चढून आलो हे नीटच कळलं.स्वतःलाच विश्वास बसत नव्हता. आता हातात वीस मिनिटे होती आणि रस्ता उमजत नव्हता. बराची लोकल सापडणेही कठीण होते. एखाद किमी फ़िर्फ़िर करूनही अवढव्या गडावरून खाली उतरायला रस्ता सापडणे कठीन होते.समोर द्रुतगति मार्ग आणि रेल्वेरुळ दिसत होते.शेवटी एका मार्गाने उअतरता येईल असं वाटलं.पण सगळ्यांनी न उतरता आधी मी आणि मिहीर उतरायला लागलो.मार्ग जर निर्धोक असेल तरच वरच्यांना उतरायला सांगायचे असं ठरलं.तिथेच दोनतिनदा चुकत शेवटी मार्ग मिळाला.बाकिचेही उतरू लागले.पण पुढे अवघड वाट होती.अगदी जपूनच उतरावे लागत होते.लवकरच लक्षात आले की या वेगाने पाचची लोकल पकडणेही कठीण होईल.शेवटी घरी असणार्या जबाबदार्या लक्षात घेता मी,मिहीर आणि अर्जून असे अक्षरशः दौडत खाली निघालो.बाकीजण जमेल त्या वेगाने उतरत होते.आम्ही पळायला सुरवात केली तेव्हा शेवटचा मावळा अगदी उंचावर दिसत होता. आम्हाला दोनची लोकल पकडायचिच होती.त्यामुळे सरळ पायवाट सोडून आम्ही जंगलात शिरलो.तिथेच सगळी गडबड झाली.एका ठिकाणि आल्यावर लक्षात आले की असेच खाली उतरणे आता अशक्यच आहे.मग वळसा घालून उजव्या डोंगरावरून खाली उतरायचं असं ठरलं.पाणी जवळ नव्हतंच.मध्येच धावाद्जाव करतांना वाटेत एक काळीकुट्ट बाई दिसली.तिच्या चेहर्यावर माती लागल्याने चेहरा भुरकट दिसत होता. आणि अगदी वाटेतच ती बसलेली होती.एकदम तिच्या समोर आल्याने मी दचकून थबकलो.मागून आलेला मिहीर मला आदळला आणि आम्हाला असं आडवाटेवर पाहून तीही भयानक घाबरली.धीर करून तिला विचारताच्ग तिने रस्ता सांगितला. आणि आम्ही पुड्झे जाउन एका घळीत उतरलो.बाजूला गर्द जंगल आणि समोर काट्यांतून जाणारी घळीची वाट! काही ठिकणि गुढग्यांवर रांगत पुढे जावं लागत होतं.मध्येच पुन्हा घळीतून बाहेर येऊन पुढची वाट कशी आहे ते पहायचं आणि पुन्हा चालायला लागायचं. इतका वेळ समोर दिसत असणारे रेल्वेरुळ आणि द्रुतगतिमार्ग आता दिसतही नव्हते.खाली किती उतरायचं याचाही अंदाज येत नव्हता.पण नेटाने उतरत होतो. अचानक गुरगुरल्यासारखा आवाज आला.मी आणि मिहीर एकदम दचकलो. मनात काही शब्द उठले.. बिबळ्या…. वाघ! अर्जुनकडे पाहिले तर तो अगदीच normal होता. आवाज कसला आला असं विचारलं तर म्हणतोय की ‘ढेकर आला’. आपल्याच मूर्खपणाला हसत परत उतरू लागलो. अचानक शेकडो फ़ुलपाखरं डोळ्यांसमोर उडतांना दिसलि. अहाहा! काय देखावा होता तो! असल्या वाटेने आल्याचं अगदी सार्थक करणारा! पण वेळ कमी होता.आता तीनची तरी लोकल मिळायला हवी असं वाटत होतं.आणि समोर रुंद पायवाट दिसली.त्याच वाटेने पुढे जाताच. आम्ही जमिनीवर आल्याचे जाणवले.समोर र्रस्त्याच्या कडेला असलेली तीन मजली ईमारत पाहून अगदी हायसं वाटलं. मागच्या तीन तासांत पहीलीच मानवनिर्मित वस्तू आमच्यापेक्षा उंच आहे हे पाहून आनंद झाला. तेव्हा दोन पंनास झाले होते.पुन्हा पळत निघालो.मळवली गावात येणारा overbridge crossकेला आणी धापा टाकत लोकल पकडली. त्यावेळी कुल आणि GS भाजे गावात पोचत होते आणि बाकीचे तीनजण वाटेवर होते. सगळेजण मार्गाला लागल्याचं कळल तेव्हा आम्ही शिवाजीनगरला पोचलो होतो. एका उत्तम ट्रेकची सांगता झाली आणि पुढच्या ट्रेकचे वेध लागले.