Wednesday, June 21, 2006

मनी मायबोलि (माझी मातृभाषा)

(गायत्रिचा ब्लॉग वाचतांना लक्ष्यात आलं की ही बया विविध बोलिंत लिहित सुटलिय.तिने माझ्या मातृभाषेत लिहायच्या आधीच मी लिहिणं अगदी गरजेचं आहे :) )

आपला राज्याना उत्तरेकडना जिल्हा म्हन्जे धुये,नन्दुरबार,जयगांव आनि नाशिकना उत्तर भाग याले 'खान्देश' म्हन्तस.गंज (खूप) वरीस तठे (तिथे)मुसलमानी राजे लोकेस्नं राज्य व्हतं त्यानालागे (त्यामुळे) 'खान देस' असं नाव पडनं.आते या भागमा बोलतंस ती बोली म्हन्जे 'अहिराणी' खरं तं 'ऐरानी' बोली!
तिच मनी (माझी) मातृभाषा. माय बोलस ती 'मायबोली'! आमनि माय आन बाप येरायेर (एकमेकांशी)ऐरानीमाच बोलतंस आनि भांडतसबी!
मना (माझ्या) मायआजीले ते (तर) ऐरानी सोडता दुसरी भाषा येये न्हई. कानले ऐकाले गोड वाटस (वाटते) ऐरानी.खान्देस म्हन्जे त्याले गुजरात,मध्ये परदेस जोगे (जवळ)शे (आहे)!त्यानलागे ऐरानीमा मारवाडी,गुजराती आनि हिन्दीना बराच शब्दे येल शेतस.्वाक्यरचाना हिन्दिसारखी र्हास!कोन म्हनस जुना जमानामां ह्या भागवर 'अहिर' राजानं राज्य होतं.. त्यानालागे ह्या भासाले (भाषेला) 'अहिराणी' नाव पडनं.कोन म्हनस,'ह्या भागमां तव्हंय (तेव्हा) राह्येत त्या लोकेसले (लोकांना) 'अव्हेरी' (अव्हेरून) टाकेल व्हतं आन म्हनून त्यास्नी भाशा म्हन्जे 'अहिराणि' ! आते जे बी कारण व्हई ते व्हई.बठ्ठा लोके हाई भाषा बोलतंस हे नख्खी!गावम्हदार (गावांमध्ये) मराठी बोलनराले एक ते 'मास्तर' म्हनतंस न्हई ते 'दीडशहाना'!तुम्हले म्हाईतीच शे (आहे) बहिणबाई ह्या जयगांव जिल्हाना व्ह्यत्या.त्यास्न्या कविता ऐरानीम्हदारच शेतस! हा,यक शे,त्या भागमा ऐरानी जास्त मराठीसारखी र्हास.पन धुया भागमां बोलतंस ती पिव्वर ऐरानी!
आते (आता) मी ऐरानीम्हदार लिखानां संकल्प सोडेल शे,ते काय काय लिखसू याय (वेळ) जमीं तसा आन सुची तसं!

5 comments:

Anonymous said...

vel lagla vachayala pan maja ali.
~GD

Anonymous said...

खरंच मराठीच्या वेगवेगळ्या छटा दाखविणा-या बोली ऐकायला गोड वाटतात. बहुधा त्यामुळेच ज्ञानदेवांनी "माझि म-हाटिचिये बोलु कवतुके । अमृताते पैजा जिंके" असं म्हटलंय, :)

Nandan said...

she = chhe (aahe), ma = ma (madhye), baThTha = baddha (sagaLe) yaa kaahee shabdanvaroon gujaratishi asaNarya saamyachi kalpana yete. Lekh aavaDala. Ajoon asech vaachayla nakkeech aavaDel.

Gayatri said...

:) गिरी, वाचाले भारी मज्जा येल बाप्पा! तुनी ऐरानी बोलि बठी आवडन शे मले. डोळ्याले वाचाले अशे गोड वाटस तं कानाले किती नरम वाटंन! तुन्या लिखान्या संकल्पाले मन्या गंज शुभेच्छा शेत. तुन्या ब्लॉगवर वाचाले भेटंन त्याले 'ऐरानी शाया' मानसू :D

Proud Marathi said...

can i have your mail id or any other contact details.Thanx for forgiving my mistake :)